अलीचा नवा हॉलीवूडपट | पुढारी

अलीचा नवा हॉलीवूडपट

पुढारी ऑनलाईन

अली फजल हॉलीवूडमध्ये आपला जम बसवत चालला आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस’च्या एका भागात दिसल्यानंतर त्याला जेरार्ड बटलरच्या एका चित्रपटातही भूमिका मिळाली आहे. तर नुकतेच ‘द डेथ ऑन द नाईल’या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये अली दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री गॅल गॅडोट आणि अभिनेता केनेथ ब्रानाघ मुख्य भूमिकेत आहेत.

अगाथा ख्रिस्ती यांच्या याच नावाच्या सस्पेन्स कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. अली यात अँड्र्यू काचडॉरियन ही भूमिका साकारत आहे. इजिप्‍तच्या नाईल नदीतील एका क्रूझवरील थरारक सस्पेन्स प्रवास यात पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अगाथा ख्रिस्तींच्या ‘द मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’वरही काही वर्षांपूर्वी चित्रपट आला होता, त्यातील खुनाचे रहस्य अभिनेता केनेथ ब्रानाघ यानेच उलगडले होते.

Back to top button