रांगणा किल्ल्यावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध | पुढारी

रांगणा किल्ल्यावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

 कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्यावर पालीची नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. या परिसरात आढळलेल्या या पालीला ‘निमॅस्पीस रांगणांनसीस’ असे नाव देण्यात आले आहे. वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीचे वन्यजीव संशोधक डॉ. अमित सय्यद यांनी हे संशोधन केले. 

वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या वतीने या संशोधनाची माहिती देण्यासाठी मंगळवार पेठेतील सुप्रभा मंच कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवराजकुमार शहाजीराजे उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये डॉ. सय्यद यांनी संस्थेची माहिती दिली. तसेच रांगणा किल्‍ला व भुदरगड तालुक्यातील जैवविविधतेची ओळख करून दिली. किल्ल्याच्या गर्भात लपलेली ही समृद्धी प्रत्येकाने पाहण्यासारखी असून केवळ मजा, मस्ती म्हणून न जाता किल्‍ला संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता      

 असल्याचे सांगितले. 


  युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व विभागीय वन अधिकारी विशाल माळी, पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, गणेश खोडके  यांच्या उपस्थितीत पालीच्या प्रजातीच्या फोटोचं अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अभिजित नाळे, किरण अहिरे, देवेंद्र भोसले, अशुतोष सूर्यवंशी, राम यादव, विजय गेंजगे, अक्षय कांबळे, इम—ान मुल्‍ला, राहूल मंडलिक यांचा सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0014 : कोल्हापूर : ’निमॅस्पीस रांगणांनसीस’ पालीच्या छायाचित्राचे अनावरण करताना युवराजकुमार शहाजीराजे. सोबत डॉ. अमित सय्यद, विशाल माळी, सुहास वायंगणकर, भगवान चिले, गणेश खोडके आदी.

Back to top button