गरज पारदर्शक मानांकनाची! | पुढारी

गरज पारदर्शक मानांकनाची!

अरविंद मिश्र, ऊर्जातज्ज्ञ

पर्यावरणाशी संबंधित जगभरात केल्या जाणार्‍या खोट्या घोषणाबाजीवर न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि कार्बन मार्केट वॉचने एक अहवाल सादर केला. यात जगातील 24 नामवंत कंपन्यांकडून उत्पादन आणि सेवा या आघाडीवर पर्यावरणाबाबत करण्यात येणार्‍या दाव्यांची पडताळणी करण्यात आली. अहवालानुसार, 15 कंपन्यांनी उत्पादन आणि सेवेवरून खोटे आणि संभ्रमित करणारे दावे केल्याचे आढळून आले.

ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह (जीआरआय), टास्क फोर्स ऑन क्लायमेट रिलेटेड फायनान्शियल डिस्कोल्जर (टीसीएफडी), सस्टेनबिलिटी अकाऊंटिंग स्टँडर्ड बोर्ड (एसएएसबी) हे ईएसजीचे जागतिक निकष आहेत. इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड बोर्ड (आयएसएसबी) हे गुंतवणुकीच्या द़ृष्टीने ईएसजी आधारित ट्रेंड सांगण्याचे काम करते. या निकषाच्या आधारावरच जगभरात सध्या ईएसजीच्या अधिसूचनेनुसार आराखडा तयार केला जात आहे. भारतात बीआरएसआर अस्तित्वात येण्याबरोबरच ईएसजी रेटिंग देणार्‍या कंपन्यांतही वाढ झाली आहे. अलीकडेच सेबीने पतमानांकन संस्था (दुरुस्ती) अधिनियम 2023 सादर केले.

या माध्यमातून एखाद्या कंपनीला ईएसजी रेटिंग देण्यासंदर्भातील पायाभूत आराखडा विकसित करण्यात आला. अर्थात, पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय मुद्द्यावर कंपनीकडून सादर करण्यात येणारे दावे आणि त्यांना मिळणारी रेटिंग कितपत विश्वासार्ह आहे, हादेखील प्रश्न आहे. वास्तविक, गेल्या काही काळात पर्यावरणाशी संबंधित करण्यात येणारे दावे खोटे असल्याचे निदर्शनास येत असल्याने ही बाब जगभरातील अनेक सरकारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वृक्षारोपणाचे फोटो आपण नेहमीच पाहतो. त्यात वृक्षारोपण करणे आणि त्याची देखभाल करण्याऐवजी त्याच्यासमवेत फोटो किंवा सेल्फी काढण्यावरच अधिक भर दिलेला दिसून येतो.

संबंधित बातम्या

सध्याच्या काळात अवकाळी पाऊस आणि श्वास गुदमरून टाकणारे प्रदूषण पाहता कोणत्याही राज्यात एक दिवसांत 6 कोटी तर एखाद्याने वर्षभरात 35 कोटी झाडांची लागवड करण्यासाठी घेतलेला पुढाकार ही बाब दिलासादायक म्हणावी लागेल. शेजारील किराणा दुकान असो किंवा शॉपिंग मॉल असो; प्रत्येक ठिकाणी हिरव्या पालेभाज्या, डाळ, पीठ, टूथपेस्ट या सर्व गोष्टी पर्यावरणपूरक किंवा इको-फ्रेंडली असल्याचे सांगितले जाते. सौंदर्य प्रसाधनापासून ते विमा कंपन्यांपर्यंत सर्व जण पर्यावरणपूरक अणि रक्षक सांगण्याची स्पर्धा लागलेली आहे. प्रश्न असा की, आपल्यासमोर पर्यावरणपूरकतेबाबत करण्यात येणार्‍या दाव्यात वास्तवता किती आहे? हा प्रश्न पृथ्वीचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या मंडळींसाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

पर्यावरणाशी संबंधित जगभरात केल्या जाणार्‍या खोट्या घोषणाबाजीवर मन्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि कार्बन मार्केट वॉचने एक अहवाल सादर केला. यात जगातील 24 नामवंत कंपन्यांकडून उत्पादन आणि सेवा या आघाडीवर पर्यावरणाबाबत करण्यात येणार्‍या दाव्यांची पडताळणी करण्यात आली. अहवालानुसार, पंधरा कंपन्यांनी उत्पादन आणि सेवेवरून खोटे आणि संभ्रमित करणारे दावे केल्याचे आढळून आले. त्यांनी व्यवसायाला पर्यावरणपूरक सांगण्यासाठी केलेला प्रचार हा सत्यापासून खूप दूर जाणारा होता. 12 कंपन्यांनी डिकार्बनायझेशनवरून खोटे दावे केले, तर त्याचवेळी 24 कंपन्यांकडे बायोफ्यूएलवरून कोणतीही ठोस योजना दिसून आली नाही. पैकी केवळ चौदा कंपन्यांनी वीज वापरामुळे होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या रणनीतीवर काम केले. साहजिकच ‘ईएसजी’चे नियम आणि अटीत पारदर्शकता आणण्यासाठी आणखी त्याचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. अशावेळी बाजार नियामक संस्थेसमोरचे महत्त्वाचे आव्हान म्हणजे ईएसजी रेटिंग देणार्‍या कंपन्यांनी दिलेल्या पतमानांकनात घोळ न घालणे. म्हणूनच कंपन्यांकडून अशाप्रकारे पर्यावरण संरक्षणासंबंधित करण्यात येणार्‍या खोट्या दाव्यांवर संयुक्त राष्ट्रानेदेखील चिंता व्यक्त केली आहे. ईएसजी लागू केल्याने कंपन्यांना दीर्घकालीन लाभ होणार आहे.

Back to top button