डेस्कटॉप, लॅपटॉपचे भविष्य रोलटॉप ! | पुढारी

डेस्कटॉप, लॅपटॉपचे भविष्य रोलटॉप !

आजच्या पिढीत तंत्रज्ञान आपल्या कल्पनेपेक्षाही वेगाने वाढत आहे. नवीन तंत्रज्ञान नवनवीन शोध घेऊन पुढे येत आहे. त्यातलाच एक शोध आहे, रोलटॉप. लॅपटॉपचे भविष्य. समजा, तुमचा लॅपटॉप एखाद्या योगा मॅट किंवा वर्तमानपत्राप्रमाणे गुंडाळला आणि तुम्हाला हवे तेव्हा एक बटण दाबून उघडता आला तर? रोलटॉप ही तंत्रज्ञानाची एक लवचिक नोटबुक संकल्पना आहे, जी कागदाच्या रोलप्रमाणे दुमडली जाऊ शकते. वापरणाऱ्याला गर्दीच्या ठिकाणीसुद्धा ते नेण्याची आणि ठेवण्याची सोय होते. तंत्रज्ञान क्षेत्रातली जर्मनीची ऑर्किन ही कंपनी अशी संकल्पना सत्यात

आणण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे. यात सुमारे १७ इंची फ्लॅट- स्क्रीन ओएलईडी डिस्प्ले असेल, जोमल्टी- टच सुविधेसह आयफोनप्रमाणे सुलभता आणि कार्यक्षमता देईल. तसेच आवश्यकतेनुसार टॅबलेट पीसीसारखा दुमडले जाऊ शकेल. टच स्क्रीन कंट्रोलिंग शिवाय नोटबुक्ससारख्या कीबोर्डने सहज टायपिंगही करता येते.

रोलटॉप ही प्रत्यक्षात एक फोल्डिंग कॉम्प्युटर रचना आहे, जी रोलर पेंटरसारखी दिसेल. यात चांगली दृश्यमानता, पॉवर कॉर्ड, लाऊडस्पीकर, वेबकॅम, यूएसबी पोर्ट आणि बरेच फीचर्स असतील, ज्या वापरणाऱ्याला समाधानी बनवतील. त्याची बँकसाईड वापरकर्त्याच्या पसंतीनुसार केलेली असेल तसेच फ्लॅटबोर्डला उभी स्थिती देण्यासाठी स्टँडही असेल. यात लवचिकता असेल, दिसायलाही हा रोलटॉप सुंदर, स्टायलिश असेल. नोटबुकएवढ्या वजनाचा, वजनाने हलका आणि गुंडाळी करून वाहून नेण्यास सोपा असल्यामुळे लॅपटॉपच्या जड बॅगा बाळगायची गरज असणार नाही.

संबंधित बातम्या

ऑल-इन-वन

मॉनिटर आणि ग्राफिक टॅब्लेट एका गॅझेटमध्ये असतील तसेच यात अतिरिक्त अॅक्सेसरीज टाळणे हे रोलटॉपचे मुख्य वैशिष्ट्य असेल. सर्व वापरकर्त्यांसाठी हा कॉम्बो पॅक असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाशी जोडलेले जाऊन अद्ययावत राहू इच्छिणाऱ्या कोणत्याही वापरकर्त्याला हा शोध भविष्यात आपलासा वाटेल हे नक्की!

Back to top button