जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष-अशक्तपणा जाणवेल. छाती संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होतील

वृषभ-पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.

मिथुन- मानसन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.

कर्क- कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारामध्ये लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आपापसातील मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.

सिंह- मनाची संभ्रम अवस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांमध्ये अडचणी येतील. शेअर्स, सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या- पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.

तूळ- भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. संयमाने वागावे. कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक- महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सावधानता आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.

धनु- प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्नता लाभेल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.

मकर- वैवाहिक सौख्यात अडचणी. वादविवादापासून दूर राहावे. व्यवहारचातुर्य आवश्यक आहे.

कुंभ- आप्तेष्टांच्या व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील अतिथ्यामधे दिवस जाईल. एकंदर आर्थिक प्रगती होईल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल.

मीन- आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

Back to top button