माझी वसुंधरा अभियानात कराड पालिका राज्यात दुसरी | पुढारी

माझी वसुंधरा अभियानात कराड पालिका राज्यात दुसरी

कराड : पुढारी वृत्तसेवा ; भूमी, वायू, अग्नि, जल व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित राज्यातील नगरपालिकांची माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यातील २२२ नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शनिवारी ऑनलाईन हा पुरस्कार देण्यात आला. 

अधिक वाचा : जागतिक पर्यावरण दिन विशेष : सातारा जिल्ह्यातील वनक्षेत्रात १ हजार हेक्टरने वाढ

मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी हा ऑनलाईन सन्मान स्वीकारला. कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलगदोन वर्ष  प्रथम क्रमांक मिळवला होता.  पालिकेने  शासनाचा वसुंधरा पुरस्कार यापूर्वी मिळवला आहे. 

अधिक वाचा : पश्चिम घाट : निसर्गाची ऑक्सिजन बँक

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सण २०२०- २१ द्वितीय क्रमांकाचा पुरस्काराच्‍या ऑनलाईन वितरणावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्र सिंग यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, सौरभ पाटील यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

Back to top button