ठाकरे - मोदी दिल्ली भेटीच्या फोटोवर रोहित पवारांचे फक्त 'दोन' शब्द! | पुढारी

ठाकरे - मोदी दिल्ली भेटीच्या फोटोवर रोहित पवारांचे फक्त 'दोन' शब्द!

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.०८) भेट घोतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले. या भेटीचा फोटो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला. या ट्विट मध्ये रोहित पवार यांनी दोन शब्दांत या फोटोचे वर्णन केले आहे. लोकशाहीचं सौंदर्य! असं या भेटीबाबत रोहित पवार पवार म्हटले आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वाचा :   ‘जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच’

राज्यातील मराठा आरक्षणाचा विषय तसेच अनेक विषया संदर्भात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण असे महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे तीन नेते उपस्थित होते. तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. या चार पक्षाचे चार मोठे नेते एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. याच फोटोचे वर्णन आमदार रोहित पवार यांनी दोन शब्दात केले आहे. लोकशाहीचं सौंदर्य असे कॅप्शन देत रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. 

वाचा : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करावी : राज्याची पंतप्रधानांकडे मागणी

जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच : संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.०८) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामध्ये काही काळ मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी वन टू वन चर्चा केली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळणार का, या प्रश्‍नावर संजय राऊत म्‍हणाले, “जेव्हा ठाकरे – मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. “जर चर्चा सुरू झाली असेल, तर नक्कीच ती भेट महत्त्वाची होती”, असं देखील राऊत म्हणाले.

वाचा : ‘तैरती लाशें सिस्टम को नंगा कर गई’

Back to top button