गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत! | पुढारी

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत!

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे काल (ता.१४) सायंकाळी घरातून बाहेर पडून शहरात पायी फेरफटका (ईव्हनिंग वॉक) मारत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. संबंधितांना अंगरक्षकांनी हटकल्यानंतर त्यांनी पळ काढला. मात्र पुन्हा तेच युवक तेथे आले आणि पुन्हा दुचाकीवरुन वेगात निघून गेले.

या सर्व घटनेनंतर सातारा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला असून मंत्री सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण सातारा पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, मंत्री देसाई यांच्या बंगल्याबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

साताऱ्यातील घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरून प्राथमिक तपासाचा भाग म्हणून युवकांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागले नाही. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर त्यांच्या बंगल्या बाहेर शेण्या जाळण्यात आल्या होत्या. यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत.

कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर आंब्‍याचा ट्रक पलटी 

म्युकर मायकोसिसने पाच रूग्णांची द़ृष्टी हिरावली

महाबळेश्वर: नियमांचे उल्लंघन करत पर्यटकांची गर्दी

Back to top button