मुंबई : राज्‍यपालांच्या उपस्‍थितीत राजभवनात आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा  | पुढारी

मुंबई : राज्‍यपालांच्या उपस्‍थितीत राजभवनात आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा 

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.

योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली. सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी घेण्यात आली. 

अधिक वाचा : विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी हे सरकार पडणार नाही : संजय राऊत 

Back to top button