कोल्हापूर : व्यापाऱ्यांनो थोडे संयमाने घ्या; मंत्री हसन मुश्रीफांकडून आवाहन | पुढारी

कोल्हापूर : व्यापाऱ्यांनो थोडे संयमाने घ्या; मंत्री हसन मुश्रीफांकडून आवाहन

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या अद्यापही कमी होत नाही. जिल्ह्यातील पुर्वीपेक्षा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला. परंतु जिल्ह्यात अजून काही दिवस निर्बंध लावण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांनी थोडा संयम बाळगावा असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ते आज (ता.२५) जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते. 

अधिक  वाचा : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू

नियम डावलून काहीच करू नका, पण शासन नियमाप्रमाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश करून सोमवारपासून सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा सोमवारपासून शासन आदेश डावलून सर्वच दुकाने सुरू करू, असा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला. यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी व्यापाऱ्यांना थोडा संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

अधिक  वाचा : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा मंजूर

यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल. ठरल्यानुसार बदल होतील राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काँग्रेसचा हा फॉर्म्युला मागील वर्षी ठरलेला होता. त्याप्रमाणेच पदाधिकारी बदल होतील असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

अधिक  वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात धोका वाढला १७८५ कोरोनाबाधित; ३१ मृतांची नोंद

सारथी कार्यालयासाठी राजाराम कॉलेज येथील दोन एकर जागा निश्चित केली आहे. त्याचे उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला संभाजी राजे, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व तसेच शाहू महाराज यांची उपस्थिती असेल. 

Back to top button