रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ | पुढारी

रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. रविवारी 89.27 एवढ्यावर टक्केवारी पोहोचली आहे. मे महिन्याच्या 7 तारखेला रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 70.41 अशी सर्वात कमी नोंदली गेली होती. मागील चोवीस तासांत 28 जणांचा बळी गेला असून, दिवसभरात 645 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाच्यावतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात 3 हजार 242 चाचण्या झाल्या. 546 जणांना विलगीकरणात राहण्यास परवानगी मिळाली. तर नव्या 99 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. 

चोवीस तासांत 1 हजार 663 रुग्ण बरे झाले, 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी रुग्ण बरे होण्याची नोंदली गेलेली टक्केवारी 89.27 अशी राहिली. राज्यभरात सक्रिय रुग्ण संख्या 14 हजार 10 वर आली आहे.

मृतांची एकूण संख्या 2 हजार 625 वर

मागील चोवीस तासांत 28 बळी गेले असून, एकूण मृतांची संख्या 2 हजार 625 वर पोहोचली आहे. 28 मृतांतील 17 जणांचा गोमेकॉत, 9 जणांचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात, तर उत्तर गोवा व दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात प्रत्येकी एकाच्या मृत्यूची नोंद झाली.

 

Back to top button