म्युकर मायकोसिस रुग्णसंख्या दीडशेवर | पुढारी | पुढारी

म्युकर मायकोसिस रुग्णसंख्या दीडशेवर | पुढारी

कोल्हापूर : विकास कांबळे

म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महिनाभरात या आजाराच्या रुग्णांनी दीडशेचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे रुग्णालयांतील जागाही अपुर्‍या पडू लागल्याने बेडची संख्या वाढविण्यासाठी दबाव वाढत आहे.

म्युकर मायकोसिसने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना आखण्यात येऊ लागल्या. त्याकरिता सीपीआरमध्ये स्वतंत्र दहा बेडचा विभाग सुरू करण्यात आला. परंतु, दुसर्‍याच दिवशी सर्व बेड फुल्ल झाले. त्यानंतर काही दिवसांतच औषधांचाही तुटवडा जाणवू लागला. केवळ महिनाभरात या आजाराच्या 

रुग्णांनी दीडशेचा टप्पा पार केला आहे. सध्या रुग्णांची संख्या 152 असून, यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या 123 जणांना म्युकर मायकोसिस झाला आहे. या आजारामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून, 9 रुग्ण बरे झाले आहेत.  

कोरोना झाला नसताना 4 रुग्णांना म्युकर मायकोसिस

कोरोना झाला नसताना 4 रुग्णांना म्युकर मायकोसिस झाला आहे. म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांपैकी 113 पुरुष व 39 महिलांचा समावेश आहे.

Back to top button