कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली; दिवसभरात १०९० बाधित | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली; दिवसभरात १०९० बाधित

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मंगळवारी 1433 जण कोरोनामुक्त झाले; तर 1 हजार 90 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित 28 जणांचा मृत्यू झाला असून कोल्हापूर शहरातील 8 जणांचा यात समावेश आहे. शहरातील 292 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित 11759  सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

बाधित 11,759 पैकी हॉस्पिटलमध्ये 6 हजार 343 तर होम आयसोलेशन 5 हजार 416 रुग्ण उपचार घेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मंगळवारी शहरातील नेहरूनगर, नाना पाटीलनगर, मंगळवार पेठ, हरीपूजापूरम येथील प्रत्येकी एक तर लक्षतीर्थ वसाहत व संभाजीनगर येथील प्रत्येकी दोघांचा मृतांत समावेश आहे. उर्वरित करवीर 9, हातकणंगले 4, शिरोळ व चंदगड प्रत्येकी 2 तर  कागल, सिंधुदुर्ग, कर्नाटक येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बाधितांमध्ये आजरा 44, भुदरगड 46, चंदगड 18, गडहिंग्लज 21, गगनबावडा 1, हातकणंगले 114, कागल 54, करवीर 144, पन्हाळा 82, राधानगरी 35, शाहूवाडी 12, शिरोळ 80 जणांचा समावेश आहे. नगरपालिका कार्यक्षेत्रातील 116 जण आहेत. यात इचलकरंजी 50, जयसिंगपूर 31, गडहिंग्लज 4, कागल 9, हुपरी 5, पेठवडगाव 7 तर मुरगूड येथील 4 जण आहेत. अन्य जिल्ह्यातील 31 जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

शासकीय प्रयोगशाळेत 2635 स्वॅब आरटीपीसीआरवर तपासले. यामध्ये 346 जणांचे अहवाल बाधित आले. अँटिजेनवर तपासलेल्या 4228 स्वॅबपैकी 544 जणांना संसर्ग झाला आहे. 431 नमुने पुढील तपासणीसाठी आरटीपीसीआरवर पाठविले आहेत. खासगी प्रयोगशाळेत 719 स्वॅब तपासले. यात 200 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात 1431 जणांची कोरोनाची प्राथमिक तपासणी झाली. आरटीपीसीआरवर 3588 तर अँटिजेनवर 2554 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.

Back to top button