ओबीसी आरक्षणावर भाजपनेच पाणी सोडले | पुढारी

ओबीसी आरक्षणावर भाजपनेच पाणी सोडले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात भाजपचे सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. पाच वर्षे हातात असताना ओबीसींचे प्रश्‍न का सोडवले नाहीत, असा सवाल करत भाजपनेच ओबीसी आरक्षणावर पाणी सोडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्‍न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला. भाजपला ओबीसी समाजाची खरी काळजी असेल तर त्यांनी केंद्राकडून इंपेरिकल डाटा घ्यावा, असे भुजबळ म्हणाले. 

केंद्रीय ग्रामीण विकास आणि नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपेरिकल डाटा जमा केला. हे काम 2011 ते 2013 या काळात चालले. हा डाटा मिळावा म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि तत्कालीन प्रधान सचिव ग्रामविकास यांनी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांबरोबर पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकारचे जनगणना आयुक्‍त कार्यालय, सामाजिक न्याय मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाने डाटा न देता टोलवाटोलवी केली. त्यांनी हा डाटा  न्यायालयाला सादर केला असता तर ओबीसी आरक्षणाला धक्‍काच लागला नसता. याच प्रश्‍नावर फडणवीस सरकारने अधिवेशन का घेतले नाही, असा सवालही त्यांनी केला.

 

Back to top button