Navaratri 2023 : कोल्हापूरचे शिल्पकलेचे वैभव असणारे मंदिर | पुढारी

Navaratri 2023 : कोल्हापूरचे शिल्पकलेचे वैभव असणारे मंदिर

उमाकांत राणिंगा

सोमवार आश्विन शुद्ध दशमी, मन्मथ संवत्सर. २६ सप्टेंबर १०१५ नोंदीप्रमाणे अनंत अशा कालप्रवाहातील एक दिवस. (Navaratri 2023) मात्र, कोल्हापूर नगरीच्या इतिहासाचे सुवर्णपान याच दिवशी लिहिले गेले. अज्ञातवासात असलेली क्षेत्रस्वामिनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आपला अज्ञातवास संपवून भक्त कल्याणासाठी पुन्हा मंदिराच्या गर्भकुरीत विराजमान झाली. (Navaratri 2023 )
शककर्ते छ. शिवरायांनी मराठ्यांचे स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याचा सूर्योदय या भूमीला दाखविला.(Navaratri 2023) तत्पूर्वी आदिलशाही, मोगल पातशाही, बहामनी या राहिल्यामुळे शिल्पकतेचे वैभव असणारी मंदिर आणि त्यामधील मूर्ती शिल्पेन करणे पुजारीवर्गाच्या आवाक्याबाहेरचे बनले होते. नोंदीप्रमाणे हे अनादि क्षेत्र त्यास अवांतराचे योगास्तव बहुत कल्याणासाठी देवीची विधीपूर्वक दिवस पूर्वी देवालय सोडून पुजारी यांचे घरी होती’ असा उल्लेख सापडतो. यावरून मंदिरामध्ये श्रीमूर्ती सुरक्षित नसल्याने श्रीपूजकांपैकी कोणीतरी आपल्या घरी नेऊन जतन केल्याचे समजतेय. ()

कालक्रमाने शिवशाही स्थिरावली. स्वतेच्या चित्तात स्थिरता आली आणि नरहरी सायगावकर यांना स्वप्नात दृष्टांत देऊन देवीने पूर्वस्थ बसण्याची इच्छा व्यक्त केली. नरहरी भटांनी ही गोष्ट छ. राजारामांचे पुत्र करवीर संभाजी पहिले (छ. शिवरायांचे नातू यांच्या कानावर पडली. संभाजी छत्रपतींनी मतद सिदोजी हिंदुराव घोरपडे यांना आशा श्रींची मूर्ती विधिवत मंदिरात स्थापन केली. छत्रपतींच्या पत्रांमध्ये मूर्तीची विधीपूर्वक स्थापना करण्याने ‘स्वापीस व स्वामीच्या राज्यास बहुत कल्याणवह आहे असा उल्लेख आहे. यावरून संभाजीराजे यांची महालक्ष्मीवर किती श्रद्धा होती, हे दिसून येते. इतकेच नव्हे तर राज्याच्या कल्याणासाठी देवीची विधीपूर्वक नित्यपूजा अखंडपणे चालावी यासाठी सावगावकरांना वमशपरंपरागत हक्काने काही जमिनी वतने दिली.

सांगावकर प्रधान, पोरपडे आणि श्रीपूजक यांच्या समन्वयातून मंदिरात श्रींची पूजा कालक्रमाने शिवशाही स्थिरावली. पूजायांग होत होती. १७३१ साली छत्रपतीच्या दरबारात पूजेच्या हक्काविषयी मुनीश्वर घराण्यातच काही वाद निर्माण झाले. त्याची हकिकतसुद्धा ताराबाईकालीन कागदपत्रे या शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात सविस्तरपणे दिली आहे.

खंड २ रा पृ -११६) यानंतरच्या सुमारे २०० वर्षाच्या कालखंडात मूर्तीविषयी काही नोंदी सापडत नाहीत. मंदिरांना मिळालेल्या अलंकार व जमिनींच्या दानाची पत्रे आहेत.

कोल्हापूरची सर्वागीण प्रगती श्री महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने होत गेली. आज धार्मिक पर्यटन हे कोल्हापूरच्या आर्थिक विकासाचा महत्वाचा भाग बनलेले दिसून येते. केवळ महालक्ष्मी दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांमुळे कोल्हापूरच्या कला व कलाकारांना उत्तेजन मिळत राहिले आहे. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूजाविधीसाठी थेट आंध्र प्रदेशामधून आलेल्या मुनीश्वर परिवाराच्या अनेक पिढ्यांनी महालक्ष्मीची सेवा आजतागायत चालू ठेवली आहे. मुनीश्वर कुटुंबाच्या काही मुलींच्या सासरच्या कुटुंबाकडेसुद्धा कन्यावारसाने पूजेचे हक्क मिळाल्याने श्री महालक्ष्मीच्या पूजाविधी करणाऱ्या श्रीपूजक परिवारांचासुद्धा त्यात सहभाग आहे. देवीच्या निमित्ताने करवीर क्षेत्री अनेक धार्मिक अनुष्ठाने सतत होत राहिल्याने वैदिक पुरोहित वर्गालासुद्धा आपल्या पारंपरिक व्यवसायातून वृद्धीची दिशा मिळाली.
एक्कावन्न शक्तिपीठांपैकी जगदंबेचे त्रिनेत्र पडलेले शक्तिपीठ आणि काशी क्षेत्रापेक्षा पुण्यप्रद धर्मक्षेत्र म्हणून कोल्हापूरची ख्याती जगभरात पसरली. आज एक समृद्ध सांस्कृतिक वारसा संपन्न नगरी म्हणून कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात अग्रक्रमाने घेण्यात येते. तीनशे वर्षांपूर्वी देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात आजच्या कोल्हापूरच्या वैभवाची बीजे आहेत.

सुरक्षेच्या कारणासाठी पुजारी मूर्ती लपवून ठेवल्याचे स्थान म्हणजे कपिलतीर्थ या तीर्थकुंडाच्या तीरावरील कपिलेश्वराच्या मंदिरामागे सध्या रिकामे असलेले मंदिर होते. मूर्ती इथून उपसल्याची जमिनीवर असल्याचेही दाखवले जाते. मूळ मूर्ती कोणत्या मंदिरात ठेवली असती तर तसा उल्लेख याला हवा होता. पण कागदपत्रांप्रमाणे मूर्ती कोण्या एका पुजाऱ्याच्या घरी ठेवल्याचा स्पष्ट शब्दांत उल्लेख आहे. शिवाय एका मोठ्या मंदिरातून देवीची मूर्ती दुसऱ्या मंदिरात ठेवण्याने सुरक्षेचा प्रश्न तसाच राहतो. म्हणून ज्या कोणी अज्ञात श्रीपूजकाने राजकीय धामधुमीच्या काळात जगदंबेच्या मूर्तीला स्वत:च्या घरात सांभाळून जतन केले. त्या पुजाऱ्याचे ऋण करवीर क्षेत्रावर सदोदित राहतील, यात शंकाच नाही. धर्मप्रवृत्तीच्या करवीरकर छत्रपती संभाजीराजांनी देवीच्या मूर्ती स्थापनेची आज्ञा दिली हा सुद्धा जगदंबेचा कृपाप्रसादच.

Back to top button