

श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन : टेटर फंडिंग केस प्रकरणी (दहशतवाद्यांना पैसा पुरवठा) जम्मू -काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. राज्यात टेटर फंडिंग केस प्रकरणी ४५ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत स्थानिक पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) मदत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांना पैसा पुरवठा प्रकरणी 'एनआयए'ची आजवरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
या प्रकरणी सूत्रांनी दिलेली माहिती अशी, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणारी जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. तरीही या संघटनेकडून दहशतवाद्यांना पैसा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले होते.
'एनआयए'ने जम्मू-काश्मीरमधील १४ जिल्ह्यांतील ४५ ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. ही कारवाई जमात-ए-इस्लामी संघटनेच्या सदस्यांवर करण्यात आली आहे. तसेच नौगाम जिल्ह्यातील फलाह-ए-आम ट्रस्टवर छापे टाकले आहेत.
जम्मू -काश्मीरमध्ये ३१ जुलै रोजी 'एनआयए'चे १५ ठिकाणी छापे टाकले होते.
लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्लाह मलिक याला करण्यात आलेली अटक आणि जम्मू हवाईदलाच्या तळावर जप्त करण्यात आलेली स्फोटकप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईवेळी एकाला अटक करण्यात आली होती.
तसेच स्मार्ट फोन, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, जिवंत काडतुसे, दगडफेकीवेळी वापरण्यात येणारे मास्क आदी साहित्यही जप्त करण्यात आली होती.
यानंतर पुन्हा एकदा एनआयएने धडक कारवाई करत दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणार्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या वर्षी सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविराेधात जाोरदार माेहिम राबवली आहे. आता एनआयएच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणार्यांचे रॅकेट उद्ध्वस्त हाेण्यास मदत हाेणार आहे.
हेही वाचलं का?