Covid antiviral pill : सर्वसामान्‍यांना परवडणारी कोरोना अँटीव्‍हायरल गोळी उपलब्‍ध, ५ दिवसांचा कोर्स | पुढारी

Covid antiviral pill : सर्वसामान्‍यांना परवडणारी कोरोना अँटीव्‍हायरल गोळी उपलब्‍ध, ५ दिवसांचा कोर्स

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  कोरोना उपचारात आपल्‍या देशातही सर्वात स्‍वस्‍त अँटीव्‍हायरल गोळी ( Covid antiviral pill ) उपलब्‍ध झाली आहे. या गोळ्यांचा पाच दिवसांचा कोर्स असून याची किंमत १ हजार ३९९ रुपये इतकी आहे. कोरोना संसर्ग झालेल्‍या रुग्‍णाला देण्‍यात येणारी ही आतापर्यंतची सर्वात स्‍वस्‍त अँटीव्‍हायरल गोळी ठरणार आहे. या अँटीव्‍हायरल गोळीमुळे ( Covid antiviral pill ) साेम्‍य लक्षणे असणार्‍या कोरोना रुग्‍णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना औषध कंपनीच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, सोमवारी ( दि. ३ ) आम्‍ही कोरोना रुग्‍णासाठी अँटीव्‍हायरल मोल्‍नुपिरावीर (molnupiravir) आणले आहे. या संपूर्ण कोर्सची किंमत सुमारे दीड हजार रुपये असेल.लवकरच देशभरात आम्‍ही ही अँटीव्‍हायरल गोळी उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहोत.

मोल्‍नुपिरावीर (molnupiravir) (800 एमजी) ही अँटीव्‍हायरल गोळी आहे. १८ वर्षांवरील रुग्‍णांना कोरोनाची सौम्‍य संसर्ग असेल तरी ही गोळी दिवसातून दोन वेळा घ्‍यावी लागेल. या अँटीव्‍हायरल गोळ्यांचा पाच दिवसांचा कोर्स आहे. या गोळ्यांची किंमत ही सर्वसामान्‍यांच्‍या आवाक्‍यातील असेल, असे मत तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले. विशेष म्‍हणजे मोल्‍नुपिरावीर (molnupiravir) या अँटिव्‍हायरल गोळीला ब्रिटनच्‍या औषध नियंत्रण नियामक मंडळाने मंजूरी दिली आहे.

जून २०२१मध्‍ये भारतीय औषध नियामक मंडळानेही मोल्‍नुपिरावीर (molnupiravir) या अँटिव्‍हायरल गोळीच्‍या उत्‍पादन आणि पुरवठासाठी सन फार्मा, सिप्‍ला, टोरेंट, इमक्‍युअर आणि डॉ. रेड्‍डी या कंपन्‍यांना परवानगी दिली होती. कोरोनावरील ओरल थेरपीसाठी सध्‍या सन फार्मा, हेट्रो, नाट्‍को आणि डॉ रेड्‍डी कंपनीचा प्रयत्‍न करत आहेत.

हेही वाचलं का? 

 

Back to top button