दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण | पुढारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत आपली चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. ”आपल्याला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला घरी आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत; त्यांनी स्वतःला आयसोलेट करावे आणि चाचणी करुन घ्यावी,” असे आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.

दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल निवडणूक प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत. ते पंजाब, गोवा आणि उत्तराखंड राज्यांचे दौरे करत आहेत. काल सोमवारी ते उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून दिल्लीत परतले आहेत. या दरम्यान ते अनेक लोकांच्या संपर्कात आले आहेत.

केजरीवाल डेहराडूनमधील परेड मैदानावर आम आदमी पक्षाच्या रॅलीत सहभागी झाले होते. जर विधानसभा निवडणुकीत आप सत्तेत आल्यास उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी सन्मान निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

देशात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. सोमवारी देशाचा कोरोना संसर्गदरात त्यामुळे उच्चांकी वाढ दिसून आली.

Back to top button