अमिषा पटेलला ज्यानं प्रपोज केलं, त्याचं नाव पाहून राजकीय क्षेत्रातूनही भूवया उंचावल्या !! | पुढारी

अमिषा पटेलला ज्यानं प्रपोज केलं, त्याचं नाव पाहून राजकीय क्षेत्रातूनही भूवया उंचावल्या !!

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमिषा पटेल सध्या तिच्या ‘गदर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे. पण आता अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजवत आहे.

फैसल पटेल नावाच्या व्यक्तीने तिला प्रपोज केले आहे. मात्र, नंतर फैसलने त्याचे ट्विट डिलीट केले. फैजलसोबत अमीषा अनेकवेळा दिसली आहे पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. मात्र फैजलच्या ट्विटनंतर तो अमिषाच्या आयुष्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटना अशी आहे की, अमिषा पटेलने ३० डिसेंबर रोजी फैसल पटेलला त्याच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर काही फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. अमीषाने लिहिले की, Happy bday my darling @mfaisalpatel… love uuuuu… ❤️💖💖💞💓💘have a super awesome year ❤️💖💖💖

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

यानंतर फैसल पटेलने उत्तरात लिहिले की, धन्यवाद अमिषा पटेल. मी तुला जाहीरपणे प्रपोज करत आहे आता तू माझ्याशी लग्न करशील का?” हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे, पण ट्विट डिलीट होण्यापूर्वीच जंगलात आग पसरली होती. अमिषा फैसलला डेट करत असल्याचं सगळ्यांना कळलं.

ameesha patel www.pudhari.news

फैजलबद्दल बोलायचे तर तो काँग्रेस नेते अहमद पटेल यांचा मुलगा आणि एक यशस्वी उद्योगपतीही आहे. फैझलचे लग्न झैनाब पटेलशी झाले आहे, पण ७ जून २०१६ रोजी त्याच्या पत्नीचे निधन झाले. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या समस्येमुळे झाला होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button