माेठी बातमी : छत्तीसगडमध्‍ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद | पुढारी

माेठी बातमी : छत्तीसगडमध्‍ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे  ANIने दिले आहे.

अबुझमदच्या जंगलात नक्षलींनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्‍ये संयुक्त शोध मोहिम राबवली. अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात अद्‍याप चकमक सुरु आहे.

चार जिल्ह्यात कारवाई सुरू, नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान

रायपूरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले होते. आज सकाळी अबुझमदच्या जंगलात चकमक सुरू झाली. नारायणपूरच्या अबुझमद भागातील कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा भागात शनिवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांना मोठा फटका बसल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसपी प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जूनपासून नारायणपूर, कोंडागाव, कांकेर आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील डीआरजी, एसटीएफ आणि आयटीबीपी ५३ व्या कॉर्प्सकडून या भागात संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत.

 

Back to top button