Amanatullah Khan Bail: AAP ला दिलासा! मनी लॉड्रिंग प्रकरणात 'या' आमदाराला जामीन मंजूर
पुढारी ऑनलाईन डेस्क: आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने दाखल केलेल्या तक्रार प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर जामीन मंजूर केला आहे. हा आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मानला जात आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Amanatullah Khan Bail)
ईडीने अलीकडेच एजन्सीसमोर हजर न राहिल्याबद्दल आणि दिल्ली वक्फ बोर्डातील नियुक्ती आणि त्याच्या मालमत्तेच्या भाडेतत्त्वावरील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीत सामील न झाल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. यानंतर ईडीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर तो कोर्टाने बजावलेल्या समन्सवर हजर राहण्यासाठी आले असता, या प्रकरणात त्यांना दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाकडूने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. (Amanatullah Khan Bail)
#WATCH | Delhi Rouse Avenue court grants bail to AAP MLA Amanatullah Khan in the case registered on the complaint filed by the Enforcement Directorate against him.
The court granted him bail on a personal bond of Rs 15,000 and one surety of like amount.
ED recently had moved a… pic.twitter.com/JiMqTYHmna
— ANI (@ANI) April 27, 2024