व्हायरसचं म्युटेशन होतं कसं? | पुढारी

व्हायरसचं म्युटेशन होतं कसं?

पुढारी ऑनलाईन डेस्क

जगभरात सध्या कोरोना व्‍हायरसच्‍या ( विषाणू ) नव्या व्‍हेरियंटमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संशोधक या व्हॅरियंटवर लक्ष ठेवून आहेत; पण तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हायरसचं म्युटेशन कसं होतं? व्हायरसचं म्युटेशन ही अगदी नैसर्गिक आहे.

सर्वच व्हायरस डीएनए किंवा आरएनए या जिनॅटिक मटेरियलपासून बनलेले असतात. या जिनॅटिक मटेरियलच्या भोवतीने एक प्रोटिनचे कवच असते,  असा व्हायरस जेव्हा आपल्या शरीरात जातो, तेव्हा ते शरीरातील पेशींवर चिकटून बसतो. या व्हायरसमधील डीएनए किंवा आरएनए आपल्या पेशीत प्रवेश करतात. त्या ठिकाणी या डीएनए आणि आरएनएच्या कॉपी बनायला सुरू होतात. या कॉपी दुसऱ्या पेशीत प्रवेश करतात. व्हायरच्या कॉपी होण्यामुळे आपल्या पेशी एक प्रकारे हायजॅक होतात आणि आपण आजारी पडतो.

व्हायरसचं म्युटेशन : व्हायरसमध्येच होतात. बदल

व्हायरस जेव्हा स्वतःची कॉपी बनवतो. तेव्हा काही त्रुटी राहतात आणि व्हायरसमध्येच बदल होतात. हे बदल म्हणजेच म्युटेशन होय. या म्युटेशनमुळे व्हायरस काही वेळा अधिक शक्तिशाली बनतो. तर काही वेळा व्हायरसचा प्रभाव ही कमी होतो.

काही वेळा हे बदल अगदीच किरकोळ असतात. तर काही वेळा मात्र झालेले बदल या व्हायरसला मानवी पेशीत प्रवेश करणे आणि तिथे स्वतःच्या कॉपी बनवणे जास्त सोपे ठरतात. अशा वेळी व्हायरस जास्त धोकादायक बनतो. हे बदल एक टप्प्यावर व्हायरसच्या मूळ डीएनए किंवा आरएनएची जागा घेतात. अशा प्रकारे व्हायरसच्या स्टेनचा नवा व्हॅरियंट जन्माला येतो.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडिओ : काेराेना लस : बूस्‍टर डाेसची गरज आहे का ? 

Back to top button