भिंडमध्‍ये ‘आरएसएस’च्‍या कार्यालयात सापडला ‘पिन बॉम्ब’ | पुढारी

भिंडमध्‍ये 'आरएसएस'च्‍या कार्यालयात सापडला 'पिन बॉम्ब'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील भिंड येथील राष्ट्रीय स्वयंसंघ (आरएसएस) कार्यालयात पिन बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत बॉम्बचा तपास करून तो ताब्यात घेतला.

भिंड येथील हनुमान बाजारिया या निवासी भागात असलेल्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यालयात शनिवारी रात्री पिन बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाचे काम पाहणारे स्वयंसेवक राम मोहन यांच्या माहितीवरून एसपी असित यादव यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून बॉम्बचा तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी हा बॉम्ब आपल्या ताब्यात घेतला आहे.हा बॉम्ब ग्रेनेड बॉम्बसारखा दिसतो.

स्वयंसेवक राम मोहन शुक्रवारी संध्याकाळी कार्यालया आले. आवारात ध्वजारोहणाच्या ठिकाणी हा बॉम्ब सापडला. मुले त्याच्याशी खेळत होती. त्यांनी तो मुलांपासून काढून घेत लांब ठेवला. शनिवारी रात्री तो एका व्यक्तीला दाखवला असता त्याने बॉम्ब असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हा बॉम्ब जप्त केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा बॉम्ब बराच जुना आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी येथे फायरिंग रेंजचा परिसर होता. अशा स्थितीत हा बॉम्ब त्यावेळी मातीत गाडला गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सूरु आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button