पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनामध्ये रिपब्लिकन प्राथमिक निवडणुकांमध्ये निक्की हेली यांचा पराभव केला आहे. दक्षिण कॅरोलिनाच्या विजयामुळे ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. (US President Election)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या स्पर्धेतील विजयामुळे 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या अगदी जवळ गेले आहेत. (US President Election) या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवणे हे ट्रम्प यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान निक्की हेली मानले जात होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे शेवटचे प्रतिस्पर्धी निक्की हेली यांच्यावर विजय मिळवल्याने त्यांचा उमेदवारीचा मार्ग आता सुकर झाला आहे. (US President Election)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग चौथ्या राज्यात विजय मिळवला आहे. विशेषत: रिपब्लिकन पक्षासाठी मजबूत समजल्या जाणाऱ्या भागात ट्रम्प यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. निक्की हेली 2011 ते 2017 पर्यंत दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. या विजयाबद्दल निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले असून प्रचार सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, या विजयामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ट्रम्प आता पुढील प्राथमिक निवडणुका पुढे होणार आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी 16 राज्यांमध्ये एकाच वेळी मतदान होणार आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा: