Suvendu Adhikari vs Mamata Banerjee : “त्या एक क्रूर महिला…” : शुभेंदू अधिकारींचा ममता बॅनर्जींवर हल्‍लाबाेल | पुढारी

Suvendu Adhikari vs Mamata Banerjee : "त्या एक क्रूर महिला..." : शुभेंदू अधिकारींचा ममता बॅनर्जींवर हल्‍लाबाेल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील संदेशखली घटना समोर आल्यापासून भाजपने ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात माेहिम उघडली आहे. सर्व विरोधी पक्ष राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते शुभदू अधिकारी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.  (Suvendu Adhikari vs Mamata Banerjee )

Suvendu Adhikari vs Mamata Banerjee : त्‍यांना आता ‘दीदी’ म्हणणं बंद करा.

शुभदू अधिकारी यांनी म्हटलं आहे की, “संपूर्ण पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या आश्रयाखाली काम सुरु आहे. ममता बॅनर्जी यांना आता ‘दीदी’ म्हणणं बंद करा. आता त्या ‘काकू’ बनल्या आहे. त्या ‘दीदी’ नाहीत. ‘दीदी’ या नावासोबत एक मानवतेची भावना येते. मी विधानसभा निवडणूक दरम्यान नंदीग्राममध्ये त्यांना हरवले होते. त्यांनी माझ्यावर तब्बल ४२ गुन्हे दाखल केले होते. खरतर त्या एक ‘क्रुर’ महिला आहेत.”

 काय आहे संदेशखली प्रकरण ?

पश्मिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली गाव आहे. येथील तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख व अन्‍य तृणमूल नेत्यांनी सर्वसामान्‍यांच्‍या जमिनी बेकायदा ताब्‍यात घेतल्‍या आहेत. तसेच काही महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. हा प्रकार उघड झाल्‍यानंतर गावातील महिलांसह भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. शहाजहान शेख  हा रेशन घोट्याळ्य़ातील आरोपी आहे. ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यातही त्‍यांचा सहभाग असल्‍याचा आरोप आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर या मुद्द्यावर राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा 

Back to top button