रेल्वे – विमान सेवा विस्कळीत | पुढारी

रेल्वे - विमान सेवा विस्कळीत

चंदीगड / नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दाट धुक्यांमुळे पंजाबमधील तरनतारनमध्ये शुक्रवारी सकाळी एक वेगवान मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरला धडकून चार तरुणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग-54 वरील हरिकेनजीक आसपास हा अपघात घडला. पोलिस अपघाताची चौकशी करत आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी अद्याप कायम आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये शीतलहरींचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये हिमवर्षाव झाला. राजस्थानमधील सीकरचे तापमान शून्य अंशावर आहे. राज्यातील काही भागात हिमवर्षाव झाला. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी 16 राज्यांची दाट धुके पडले होते.

यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहारसह अन्य राज्यांचा समावेश आहे. दाट धुक्याचा परिणाम रेल्वे आणि विमान सेवेंवर झाला. दिल्ली शहरात शून्य दृश्यमानतेमुळे 39 रेल्वे उशिरा धावल्या. राजस्थानमधून दिल्लीला येणार्‍या रेल्वेंना 6 तास उशीर झाला. अमृतसरमधील 5 फ्लाईटस्नी निर्धारित वेळेत उड्डाण केले नाही. दक्षिण भारतातील राज्यातही शीतलहरी आणि दाट धुक्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तामिळनाडू आणि पड्डुचेरीत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भीषण थंडी पडली असून शुक्रवारी पहिल्यांदाच राज्यातील सहारनपूरमध्ये 2.7 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. तसेच कानपूरमध्ये 3, मेरत, 4.8, बरेली 5.4. लखनौ 6 आणि रायबरेलमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

Back to top button