राम मंदिरासाठी घेतलेले मौनव्रत तब्बल ३२ वर्षांनी सोडणार | पुढारी

राम मंदिरासाठी घेतलेले मौनव्रत तब्बल ३२ वर्षांनी सोडणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अयोध्येत 1992 मध्ये बाबरी मशीद पडली आणि त्यानंतर राम मंदिर साकारले जाईपर्यंत मौन धारण करणार्‍या महिलेची ही तपश्चर्या फळाला येत आहे. झारखंडमधील 85 वर्षीय वृद्धा सरस्वती देवी येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होईल तेव्हा आपले मौनव्रत सोडणार आहेत.

गेल्या 32 वर्षांपासून मौनव्रत धारण केलेल्या सरस्वती देवी यांची आता पंचक्रोशीत मौनी माता अशीच ओळख तयार झाली आहे. चार मुली आणि चार मुले असा मोठा परिवार असलेल्या सरस्वती देवी या कुटुंबीयांशी आणि इतरांशी हातवार्‍यांच्या माध्यमातून किंवा कागदावर लिहून संवाद साधतात. या मौनव्रताच्या काळात त्यांनी चित्रकूट येथे काही काळ व्यतीत केला. तसेच चारधाम, अयोध्या, काशी, मथुरा, तिरुपती बालाजी, सोमनाथ मंदिर आणि बाबा बैद्यनाथधाम यासह अनेक तीर्थक्षेत्रांची वारी केली आहे.

Back to top button