नववर्षारंभी शेअर बाजाराची ‘सावध’ चाल, सेन्‍सेक्‍सने अनुभवली घसरण | पुढारी

नववर्षारंभी शेअर बाजाराची 'सावध' चाल, सेन्‍सेक्‍सने अनुभवली घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक पातळीवरील संमिश्र संकेतांचे परिणाम नववर्षारंभी शेअर बाजारातील सुरुवातीच्‍या व्‍यवहारात उमटले. आज ( १ जानेवारी ) बाजारातील व्‍यवहारांशी सुरुवात सावधपणे झाल्‍याचे चित्र आहे. सुरुवातीच्‍या व्‍यवहारात सेन्सेक्स 180 अंकांनी घसरण अनुभवत 72,060 वर तर निफ्टी 43 अंकांनी कोसळत 21,688 वर पोहोचला. शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 72,240 वर बंद झाला होता.

जागतिक पातळीवरील संमिश्र संकेतांचे परिणाम नववर्षारंभी शेअर बाजारावर उमटले. शुक्रवारी अमेरिकन बाजारांमध्ये थोडी नरमाई होती. आज नवीन वर्षाच्या निमित्ताने जगभरातील बहुतांश बाजारपेठांमध्ये सुट्टी आहे. दरम्यान, अमेरिकन क्रूडच्या विक्रमी उत्पादनामुळे क्रूडच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. क्रूडची किंमत $77 वर पोहोचली आहे.

बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक विक्री

नवीन वर्षामुळे जागतिक बाजार बंद असल्याने, मंदीचा व्यापार अपेक्षित असल्‍याचे अर्थविश्‍लेषक मानतात. आज शेअर बाजार लाल चिन्हावर खुला आहे. सुरुवातीच्‍या व्‍यवहारात बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक विक्री नोंदवली जात आहे. तर निफ्टीमध्ये सुमारे १८१५ शेअर्स वाढीसह तर ५९५ शेअर्स घसरत आहेत.

टॉप गेनर आणि टॉप लूझर शेअर्स

निफ्टी कंपन्यांमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, डॉ. रेड्डीज लॅब्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि डिव्हिस लॅबचे शेअर्स सर्वाधिक वाढले. त्याच वेळी भारती एअरटेल, आयशर मोटर्स, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो आणि LTIMindtree यांचे समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button