प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता? | पुढारी

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्रशांत किशोर ज्यांनी भारतीय राजकारणात एक यशस्वी निवडणूक रणनितीकार म्हणून ख्याती मिळवली आहे. त्यांनी काल देशातील प्रमुख विरोध पक्ष काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांची भेट घेतली होती.

प्रथमदर्शनी ही भेट आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली असल्याचे भासत होते. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उभयंतामध्ये यापेक्षाही महत्वाची चर्चा झाली आहे.

यावरुन प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांना बळ मिळत आहे.

अधिक वाचा :

प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे गांधी परिवार आणि प्रशांत किशोर यांच्यात त्यांना पक्षात अधिकृत स्थान देण्याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. ही चर्चा विविध राज्यातील आगामी निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झाली आहे.

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मंगळवारी किशोर यांच्याबरोबर बोलणी झाली. यावेळी गांधी परिवारातील तीनही व्यक्ती हजर होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची बोलणी पहिल्यांदाच झालेली नाही.

ही बैठक जरी पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली असली तरी यामध्ये कोणत्यातरी मोठ्या विषयावर चर्चा देखील झाली आहे.

या सर्व घडामोडी प्रशांत किशोर यांना २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये कोणतीतरी महत्वाची भुमिका देण्यात येण्याची शक्यता आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू निवडणुकीनंतर आपण आता निवडणूक रणनितीकार म्हणून काम पाहणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

अधिक वाचा :

वेगळ्या भुमिकेचे आधीच दिले संकेत

ते म्हणाले होते की, ‘जे काम मी आता करत आहे ते काम मी इथून पुढे करु इच्छित नाही. आता आयुष्यात ब्रेक घेऊन वेगळे काही करण्याची वेळ आली आहे. मी ही जागा सोडू इच्छितो.’

त्यांनी हे वक्तव्य पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशीच केले होते.

त्यानंतर त्यांना तुम्ही पुन्हा राजकारणात येणार का असे विचरले असता त्यांनी मी एक अयशस्वी राजकारणी आहे. मला मी काय करु शकतो हे पहावे लागेल.’ असे उत्तर दिले होते.

ते गमतीने मी कुटुंबासोबत आसाम जाऊन चहाच्या मळ्यात काम करेन असे म्हणाले होते.

या त्यांच्या वक्तव्यानंतर नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड सोडल्यानंतर आता प्रशांत किशोर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का अशी चर्चा सुरु झाली.

अधिक वाचा :

किशोरांचा काँग्रेसबरोबरचा भूतकाळ बरा नाही

पण, प्रशांत किशोर यांचा काँग्रेसबरोबरचा भूतकाळातील अनुभव हा फारसा समाधानकारक नाही. २०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली होती.

या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता मिळवली होती. किशोर यांनी काँग्रेसबरोबर काम करताना फक्त पंजाबमध्ये सत्ता मिळवता आली होती.

प्रशांत किशोर हे देशातील सर्वात जुन्या पक्षावर त्याच्या कार्यपद्धतीवरुन टीका करतात. त्यांनी काँग्रेस हा शंभर वर्ष जुना पक्ष आहे आणि त्याची एक कार्यपद्धती आहे असे म्हणातात.

ते काँग्रेसबाबत म्हणाले की ‘ते लोकांनी सल्ला दिल्याप्रमाणे काम करण्यासाठी ते लवचिक नाहीत. ते माझ्या पद्धतीने काम करण्यासाठी तयार नाहीत. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे हे मान्य करुन त्याबाबत काहीतरी केले पाहिजे.’

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, काँग्रेसने त्यांचे कुठे चुकते हे शोधण्यासाठी स्वतःचे आत्मपरिक्षण केले पाहिजे.’

हेही वाचले का?

पाहा : आयुर्वेदिक गॅलरीचा व्हिडिओ

Back to top button