मुंबई : पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे आमदार amol mitkari यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असा सल्ला पंकजा मुंडे यांना दिला आहे. amol mitkari यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवले गेले असल्याचे म्हटले आहे.
ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय.
अधिक वाचा :
मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. "नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका. असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुर्णविराम दिला. परंतु कार्यकर्ते राजीनामा देत असल्याने अद्यापही चर्चा सुरु आहे.
मुंडे दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.
अधिक वाचा :
दरम्यान मुंडे भगिनी मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली. यावेळी मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिका मांडल्या.
मुंडे यांनी सुचक शब्दात भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. ज्या दिवशी वाटेल या ठिकाणी राम नाही त्या दिवशी पाहू अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
मुंडे यांनी समर्थकांनी दिलेले राजीनामे नामंजूर केले आहेत. दबावतंत्राचा वापर करायचा नसल्याचे त्या म्हणाल्या. शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळणार असल्याचे त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळून मी कोणालाही घाबरत नाही,
अधिक वाचा :
मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.'मी निवडणूक हरले, पण संपले नाही, म्हणून तर संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत',
पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. मी कोणाकडेही कधीही पद मागितले नाही. भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत त्या म्हणाल्या की, 'मी माझ्या समाजाच्या मंत्र्याला अपमानित का करू? पक्ष हे आपल्या कष्टाने तयार केलेले घर आहे, ते मी का सोडू?' असा सवालही मुंडे यांनी केला.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="3746"]