

पुढारी ऑनलाईन डेस्क : LinkedIn ला लाईव्ह रिज्युम म्हटलं जातं. त्यामुळे Facebook वरील कॅज्युअल अॅप्रोच इथं नको.
LinkedIn प्रोफाईल चांगल्या प्रकारे करून देणाऱ्या कंपन्याही आहेत.
त्यांची मदत घेऊनही प्रोफाईल चांगला करू शकता. LinkedIn वर आपण कुणाचा प्रोफाईल चेक केला तर त्यांना मेसेज जातो.
त्यामुळे फेसबुक, इन्स्टासारखा स्टॉकिंगचा उपदव्याप इथं करू नका. लिंक्डइन हे Tinder नाही हे नेहमी लक्षात ठेवा. त्या अकाऊंटवर 500च्या वर कनेक्शन असणं चांगलं समजलं जातं.
अधिक वाचा :
जर आर्थिक क्षमता असेल तर प्रिमियम सेवाही घेणं कधीही उत्तम आपण जो जॉब चेक केला आहे, तशा प्रकारेच जॉब ते आपल्याला सुचवते.
आपणही हव्या त्या कीवर्डने जॉब सर्च करू शकतो. अनेक मोठ्या कंपन्या लिंक्डइन वरील प्रोफाईलची लिंक विचारतात.
त्यामुळे लिंक्डइन प्रोफाईल उत्तम राहील याची काळजी घ्या. लिंक्डइनवर बरेच कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.
काही फ्री तर काही पेड स्वरूपाचे असतात. LinkedIn वर फार चांगलं नेटवर्क उभं करता येतं. एखाद्याला नोकरीची गरज असेल तर आपले कनेक्शन पुढाकार घेऊन मदत करतात, असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे.
त्यामुळे लिंक्डइनवर नेटवर्क चांगलं होईल यासाठी वेळ देणं कधीही चांगलं.
अधिक वाचा :
समजा X व्यक्तीने नोकरीच्या शोधात आहे, अशी कमेंट केली, आणि त्यावर Y कनेक्शने प्रतिक्रिया दिली तर ही X व्यक्तीची पोस्ट ही Y व्यक्तीच्या फॉलोअर्सना दिसते. अशा प्रकारी ही पोस्ट वाढत जाते.
LinkedIn च्या अकाऊंटवर ३० हजार कनेक्शनचं लिमिट आहे. काही वेळा HR त्यांच्या अकाऊंटवर जॉबची माहिती देतात.
अधिक वाचा :
ही ओपनिंग LinkedIn च्या जॉब सेक्शनमध्ये असेलच असे नाही. त्यामुळे दिवसातील थोडा वेळ LinkedIn वर देणं कधीही उत्तम.
Network Is Networth असं म्हटलं जातं. त्यामुळे जगभरातील CEO, उच्चपदस्थ लिंक्डइन वर आहेत. Corporate जगतात लिंक्डइन अत्यंत महत्त्वाची नेटवर्किंग साईट बनली आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंगच्या जगात लिंक्डइनअत्यंत महत्त्वाची साईट बनली आहे.
हे ही वाचा :
हे ही पाहा :
[visual_portfolio id="3941"]