नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका वधेरा यांची भेट घेतली. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीमुळे आता नव्या राजकीय रणनीतीची चर्चा राजकीय वुर्तळात होत आहे.
अधिक वाचा
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी प्रियंका वधेरा आणि काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते.
पंजाब विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी किशोर यांच्याकडे होती. आता त्यांच्याकडे उत्तराखंड, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये हाेणार्या निवडणुकीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी दिली जाईल,अशी शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सद्यस्थितीतील राजकारणावरच चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२१ जून रोजी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. १५ दिवसांमधील ही सलग दुसरी भेट ठरली होती. भाजपविरोधात तिसर्या आघाडीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता यक्त करण्यात आली होती.
असे मानले जाते की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनुसारच लढल्या होत्या. निवडणुकीमधील यशामुळे ममता बॅनर्जी यांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती.
आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम बंद केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी केली होती. यानंतर त्यांनी राहुल गांधी व प्रियंका वधेरा यांची भेट कोणत्या कारणांसाठी घेतली याचीही चर्चा आता रंगली आहे.
२०१७मध्ये त्यांच्या सल्ल्यानेच काँग्रेसने समाजावादी पार्टीबरोबर आघाडी केली होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचलं का ?