शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीला आपण का नव्हतो?; नाना पटोले यांनी केला मोठा खुलासा | पुढारी

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीला आपण का नव्हतो?; नाना पटोले यांनी केला मोठा खुलासा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचाही नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षात कुरुबुरी सुरू असल्याची चर्चा सुरु आहे.

अधिक वाचा :

याच दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नव्हते. त्यावर आता पटोलेंनी खुलासा केला आहे.

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचं मला आमंत्रण नव्हतं. असे पटोले यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काँग्रेस ताकदीने मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन समाजाचं खच्चीकरण केलं, असा आरोप त्यांनी केला आहे.

अधिक वाचा :

मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बदलीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळातील बदलाचे निर्णय हायकमांड घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधकांकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. मोदी सरकारनं देश विकायला काढला आहे. राहुल गांधीच्या नेतृत्त्वात देशात काँग्रेसची सत्ता येईल, असे भाकित त्यांनी केले आहे.

दरम्यान, उद्या आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात महागाई वाढली आहे. याबाबत निवदेन देणार आहोत. त्यासाठी सायकलीने जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : 

पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल तक्रार केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि नाना पटोले यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. राज्य सरकार अडचणीत येईल, अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नका, अशा शब्दांत एच. के. पाटील यांनी बजावले आहे.

हे ही वाचा 

पहा व्हिडिओ : आता परदेशी फळं मिळणार मुंबईच्या टेरेसवर

Back to top button