जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा | पुढारी

जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश मिळालेले आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडरदेखील सहभागी होता.

पुलवामा चकमकीबद्दल जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करून सांगितले की, एकूण ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यात एक अज्ञात दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील शस्त्रं, दारुगोळ आणि आपत्तीजनक साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.
पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या या दहशतवाद्यांना एजाज उर्फ अबू हुरैरा याच्या रुपावरून ओळखले. तो पाकिस्तानचा राहणारा आहे. हा एजाज चकमकी दरम्यान आणखी दोन दहशतवाद्यांसमवेत मारला गेला.
पोलिस आणि सैन्याच्या एका समुहाने दहशतवादी असल्याच्या माहितीवरून संबंधित ठिकाणाला घेरलेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी चकमक सुरू झाली. जेव्हा सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणावर गोळीबार सुरू केला. त्यांनंतर दोघांमध्ये चकमक झाली. त्यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
याबद्दल काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पोलिसांचे आणि भारतीय सैन्याची अभिनंदन केले. जम्मू-काश्मीर येथे मागील १३ दिवसांमध्ये १६ दहशतवाद्यांना मारण्यात यश मिळालेले आहे. २ जुलैला पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
यानंतर ८ जुलैला राजौरीमध्ये २ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले होते. १० जुलैला अनंतनागमध्ये पुन्हा ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला. तसेच १२ जुलै राजौरीच्या सुंदरबनी सेक्टरच्या दादल जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून ३ दहशतवादी मारण्यात आले. आणि आज पुलवामामध्ये सुरक्षा दलाने आणखी ३ दहशवाद्यांना कंठस्नान घातले.

Back to top button