दिया मिर्झा हिने दिला गोंडस मुलाला जन्म | पुढारी

दिया मिर्झा हिने दिला गोंडस मुलाला जन्म

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दिया मिर्झा हिचा पती वैभव रेखी याने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे.दियाने आपल्या मुलाचे नाव अवयान अजाद रेखी (Avyaan Azaad Rekhi) असे ठेवण्यात आले आहे.

अधिक वाचा 

बाई, बुब्स आणि ब्रा पोस्टमुळे चर्चेत आलेली हेमांगी कवी अभिनय क्षेत्रात आली कशी?

hemangi kavi च्या बाई, बुब्स ब्रा… पोस्टवर या सेलेब्रिटींनी दिला पाठींबा

दियाने १४ मे रोजी मुलाला जन्म दिला होता. परंतु मुलाची तब्येत नाजूक असल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.दिया आणि अवयान यांची प्रकृती सध्या ठिक असल्याने वैभव रेखीने या गुडन्यूजचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत दियाच्या हातात बाळाच्या हात दिसत आहे.

अधिक वाचा

जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका वधेरांची भेट

या फोटोसोबत वैभव रेखी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या मुलाला पाहणे हे खरोखर आश्चर्यकारक अनुभव आहे. हा आमचा निर्णय महत्त्‍वाचा ठरला.”हे एक वैभव आणि माझ्या भावनांचे उत्तम उदाहरण आहे. आमच्या हृदयाचा ठोका, आमचा मुलगा अवियन अजाद रेखीचा १४ मे रोजी जन्म झाला.

लवकर आम्ही हॉस्पिटलमधून सुखरूप घरी परतणार आहेत. हॉस्पिटलमध्ये आमची परिचारिका आणि डॉक्टरांनी काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानते.”माझ्या गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीर बॅक्टेरियातील संसर्गामुळे दियाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.’

अधिक वाचा 

हेमांगी कवीच्या पोस्टला युजर्सकडून hats off

ब्रा : माझे स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालतील पण ब्रा घालणार नाही

सर्व चाहत्यांचे आभार

‘अवयानची आजी-आजोबा आणि मोठी बहिण समीरा हे त्यांची आतुरतेने वाट पाहात आहेत. यासोबत सर्व चाहत्यांचे आभार.’ असे कॅप्शममध्ये म्हटले आहे.हा फोटो व्हायरल होताच बॉलिवूड स्टार्संसोबत अनेक चाहत्यांनी कॉमेंन्टस करत शुभेच्छा दिल्या आहेत.

यात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने दियाला शुभेच्छा देत हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर बिपाशा बसुने प्रेम, प्रेम, प्रेम.. खूपच प्रेम. असे लिहिले आहे.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या आधीच दिया ६ महिन्याची प्रेग्नेंट होती.
दियाने गेल्या एप्रिल महिन्यात प्रेसेंसी बाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. दियाचे हे दुसरे लग्न आहे.

याआधी दियाने साहिल सांघासोबत २०१४ मध्ये लग्न केले होते. यानंतर दोघांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला.

हेही वाचलंत का?

अभिनेता शाहीर शेख साकारणार ‘पवित्र रिश्ता’मधील मानव

दिलीप कुमारांनी घडवली हाेती यशपाल शर्मा यांची क्रिकेट कारकीर्द

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

दिलीपकुमार : अमिताभ बच्चन यांच्या नजरेतून

पाहा : कोण होणार मराठी करोडपती निमित्त अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास बातचीत

Back to top button