Earthquake in Delhi : दिल्ली भूकंपाने पुन्हा हादरली,केंद्रबिंदू नेपाळमध्ये | पुढारी

Earthquake in Delhi : दिल्ली भूकंपाने पुन्हा हादरली,केंद्रबिंदू नेपाळमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे.  (Earthquake in Delhi) मागील दोन आठवड्यापासून दिल्लीला तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये आहे. तर ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्याचे धक्के दिल्ली परिसरालाही बसले.  सध्यातरी या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.Earthquake in Delhi

Earthquake in Delhi : भूकंप का होतात?

तज्ज्ञांच्या मते, भूकंपाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थितीत बदल होणे. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात. अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान, प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो. (Earthquake)

भारतही एक केंद्र बनत आहे

गेल्या काही दशकांपासून भारत हा भूकंपाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. देशात सर्वत्र भूकंपाचा धोका वेगवेगळा आहे आणि या धोक्यानुसार देशाची अनेक झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५ यांचा समावेश आहे. झोन-२ म्हणजे सर्वात कमी धोका असलेला आणि भूकंपाच्या दृष्टीने सर्वात धोकादायक क्षेत्र झोन-५ आहे.

भारतातील हा भाग आहे सर्वात धोकादायक

भारतात विभाग (क्षेत्र ५) अर्थात संपूर्ण ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश होतो. या भागात वारंवार भूकंप होत असतात. तर  क्षेत्र -४ मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचा उर्वरित भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तरी भाग, सिंधू-गंगा खोरे, बिहार आणि पश्चिम बंगाल, गुजरातचा काही भाग आणि पश्चिम किनार्‍याजवळील महाराष्ट्राचा काही भाग आणि राजस्थान यांचा समावेश होतो.

हैदराबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI) मधील भूकंपशास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हणाले होते की,”पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्लेट्स आहेत ज्या सतत गतीमध्ये असतात. त्या दरवर्षी ५ सें.मी. सरकतात. परिणामी हिमालयाच्या बाजूने ताण निर्माण होतो आणि मोठ्या भूकंपाची शक्यता वाढते.”

हेही वाचा 

Back to top button