Rozgar Mela | पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वाटप | पुढारी

Rozgar Mela | पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५१ हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वाटप

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२८) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५० हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नियुक्ती करणाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, “दिवाळीला थोडा वेळ आहे, पण ५०,००० नियुक्तीपत्रे मिळवणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हा प्रसंग दिवाळीपेक्षा कमी नाही.” (Rozgar Mela)

हा प्रसंग दिवाळीपेक्षा कमी नाही : नरेंद्र मोदी

आज (दि.२८) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५० हजारांहून अधिक तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरात ३७ ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरती होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, “रोजगार मेळावा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. आतापर्यंत लाखो तरुणांना नियुक्ती देण्यात आली आहे. आज ५० हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. दिवाळीला थोडा वेळ आहे, पण ५ हजार नियुक्तीपत्रे मिळवणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हा प्रसंग दिवाळीपेक्षा कमी नाही.

पुढे बोलत असताना ते म्हणाले की,” देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित ‘रोजगार मेळावा’ हा तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे. आमचे सरकार तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे.  केवळ रोजगारच देत नाही तर आम्ही संपूर्ण यंत्रणा पारदर्शक बनवत आहोत. त्यामुळे रोजगार प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास वाढला आहे. आम्ही केवळ भरती प्रक्रिया सुव्यवस्थित केली नाही तर काही परीक्षांची पुनर्रचनाही केली आहे. कर्मचाऱ्यांच्या भरती चक्रातील वेळ निवड आयोग निम्म्याने कमी केला आहे. एसएससीच्या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जातात. यामुळे भाषेच्या अडथळ्याचा सामना करणाऱ्यांना संधी मिळाली आहे.”

Rozgar Mela : रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य

देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि शिक्षण मंत्रालयासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल.

हेही वाचा 

Back to top button