Ambadas Danve : सरकारी समित्या तोंडदेखल्या; दोषींनाच वाचवतील अंबादास दानवे यांचा आरोप | पुढारी

Ambadas Danve : सरकारी समित्या तोंडदेखल्या; दोषींनाच वाचवतील अंबादास दानवे यांचा आरोप

पुणे : ‘दादा भुसे किंवा त्यांचा पीए कोणीही दोषी असल्यास कारवाई झालीच पाहिजे. शासनाने चौकशीसाठी समिती नेमली असली, तरी सरकारी समिती तोंडदेखल्या, बोलघेवड्या असतात. समित्या काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतील,’ असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ‘नागपूर अधिवेशनात या प्रकरणी आम्ही आवाज उठवू,’ असेही त्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी ससून रुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. औषधपुरवठा, मनुष्यबळ, रुग्णांचे हाल आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचीही भेट घेतली. या वेळी ललित पाटील प्रकरणावरूनही त्यांनी सरकारवर आणि ससून प्रशासनावर निशाणा साधला. ‘डीनवर राजकीय दबाव असल्याने ते काही बोलत नसले तरी आम्हाला अनेक गोष्टी कळल्या आहेत,’ असेही ते म्हणाले.
दानवे म्हणाले, ‘ललित पाटील प्रकरणावर डीन स्पष्टपणे काहीही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या सहकार्‍यांचा यात हात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात कोणी कोणी मदत केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ससूनमधून एक कैदी पोलिस बंदोबस्तात असतानाही चालत निघून जातो, याला गृहमंत्री जबाबदार नाहीत का?’ असा सवालही त्यांनी केला.

काय म्हणाले दानवे ?

गुजरातला प्रकल्प हलवले जात आहेत. आता हिर्‍यांचा व्यापारही नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आर्थिक राजधानी मुंबईच राहणार आहे. मुंबईचे महत्त्व जे कमी करतात ते महाराष्ट्रद्रोही आहेत. मराठा आरक्षण हा जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा हे आरक्षण कोर्टात गेले तेव्हा फडणवीस म्हणाले होते की, आमचे सरकार आल्यावर मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होईल.

आता केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर समाजाला आरक्षण मिळेल. बारामतीत जाऊन मोदी शरद पवार माझे गुरू आहेत आणि त्यांचं बोट धरून पुढे जातो, असे म्हणाले होते. अजित पवार यांच्यावर भ—ष्टाचाराचे आरोप केले आणि आता त्यांना सोबत घेतले. मोदी काय बोलतात याचा काहीही भरवसा नाही.

ससून रुग्णालयात औषधांचा योग्य पुरवठा होत नाही. रुग्णालयात हाफकिनमार्फत एकही रुपयाची औषध खरेदी झालेली नाही. जिल्हा नियोजन मंडळातून एकही रुपया औषध खरेदीसाठी देण्यात आलेला नाही. झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीही पूर्णपणे राबवण्यात आलेली नाही. डॉक्टरांची संख्याही कमी आहे. इथला निधी डॉक्टर स्वत:च्या मर्जीने खर्च करतात. डॉक्टर औषधोपचार करतात की कैद्यांचे पालन पोषण करतात ?

– अंबादास दानवे

हेही वाचा

सोलापूर : चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्‍या कारखान्यातून कोट्यवधींचे एमडी ड्रग्‍ज जप्त

तुजं माजं सपान: वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल का प्राजक्ता?

थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी कोल्हापुरात : सतेज पाटील

Back to top button