वटवाघळांमुळे ‘निपाह’ चे संक्रमण | पुढारी

वटवाघळांमुळे 'निपाह' चे संक्रमण

केरळमध्ये निपाह विषाणूने धुमाकूळ घातला असून, तेथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. निपाह व्हायरस वटवाघूळ आणि डुक्कर यासारख्या प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

  • निपाह विषाणू पहिल्यांदा १९९८ मध्ये मलेशियातील सुंगई निपाह गावात आढळून आला होता. या गावाच्या नावावरून निपाह असे नाव पडले.
  • त्याच वर्षी सिंगापूरमध्येही हा विषाणू आढळला होता. यानंतर २००१ मध्ये बांगला देशात या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले.
  •  २०१८ मध्ये केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात निपाहमुळे १६ लोकांचा मृत्यू झाला होता.
  • त्याआधी कोचीमध्ये २०१९ मध्ये निपाहचा एक रुग्ण आणि २०२१ साली कोझिकोडमध्येही एक रुग्ण आढळला होता.

लस उपलब्ध नाही

निपाह विषाणूला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. हा विषाणू थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करतो. त्यामुळे संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात.

ही आहेत लक्षणे

विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे.

Back to top button