देशाच्या विविध भागात २,३८१ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट | पुढारी

देशाच्या विविध भागात २,३८१ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थविरोधी खात्याने (एनसीबी) मागील काही काळात सुमारे 2381 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. हे अंमली पदार्थ आज (दि.१७) देशाच्या विविध भागात नष्ट करण्यात आले. अंमली पदार्थ नष्ट करण्याचा हा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आभासी माध्यमातून पाहिला.

नष्ट करण्यात आलेले अंमली पदार्थ बहुतांश मध्य प्रदेशातले होते. दरम्यान ‘अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत गृहमंत्री शहा यांनी सहभाग घेतला. एनसीबीच्या हैदराबाद विभागाने 6590 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. तर इंदोर आणि जम्मू विभागाने क्रमशः 822 किलो व 356 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत अंमली पदार्थांचे साठे नष्ट करण्यात आले.
हेही वाचा

Back to top button