लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्र याचा जामीन वाढला | पुढारी

लखीमपूर खिरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्र याचा जामीन वाढला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेणी यांचा मुलगा आशिष याचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबरपर्यंत वाढविला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली.

सत्र न्यायालयात सदर प्रकरणाच्या अनुषंगाने दररोज सुनावणी घेण्याची विनंती अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या प्रकरणाच्या नियमित सुनावणीला परवानगी दिली तर इतर खटले प्रभावित होऊ शकतात, अशी टिप्पणी त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. याआधी 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्र याचा अंतरिम जामीनअर्ज मंजूर केला होता. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याच्या घटनेवेळी आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:

Back to top button