Sonia Doohan : शरद पवार ‘बाहुबली’, प्रफुल्ल पटेल ‘कटाप्पा’; दिल्लीत होर्डिंग लावणाऱ्या सोनिया दुहान कोण आहेत? | पुढारी

Sonia Doohan : शरद पवार 'बाहुबली', प्रफुल्ल पटेल 'कटाप्पा'; दिल्लीत होर्डिंग लावणाऱ्या सोनिया दुहान कोण आहेत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या दिल्ली स्थित ६ जनपथ निवासस्थानाजवळ शरद पवार ‘बाहुबली’, प्रफुल्ल पटेल ‘कटाप्पा’ असे दर्शवणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी लावले असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर पोस्टरमध्ये बाहुबली चित्रपटातील कट्टप्पाप्रमाणे प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या पाठीवर वार करताना दिसत आहेत. या पोस्टरबद्दल शरद पवारांना विचारले असता दिल्लीतील एनसीपी एवढी सक्रिय आहे. हे मला माहिती नव्हते, असे उत्तर शरद पवारांनी दिले आहे. दरम्यान, ही पोस्टर झळकावणाऱ्या सोनिया दुहान कोण आहेत? जाणून घेऊयात…

Sonia Doohan : कोण आहेत सोनिया दुहान

सोनिया दुहान सध्या चर्चेत आहेत. सोनिया यांची चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. तर २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे-पहाटे युती करत सरकार स्थापन केलं हाेते. यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया सध्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत.  शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या  सोनिया दुहान (Sonia Dohoon) या हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड येथील रहिवासी आहेत.  त्यांच्या वडिलांच नाव संसार सिंह तर आईच नाव संतरो देवी असं आहे. २०१३ मध्ये त्यांच्या वडिलांच कॅन्सरने निधन झाले. तिघा भांवडात त्य़ा सर्वात मोठ्या आहेत. घरातील मोेठी मुलगी म्हणून घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येवून पडली. त्यांनी शिक्षण त्यांच्या गावातच झालं. माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठ मधुन बीएससी पुर्ण केले. बीएससी झाली.  त्यानंतर त्या अंबाला येथे आल्या.

अशी झाली राजकारणात एंट्री (Sonia Doohan)

सोनिया या पायलटच्या शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आल्या. तिथे त्यांनी पायलटचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण दरम्यान त्या राष्ट्रवादी क़ॉंग्रेसच्या संपर्कात आल्या. सोनिया यांनी वयाच्या २१ व्या वर्षी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामिल झाल्या. दिल्ली युनिव्हिर्सिटीमध्ये त्यांनी दोन निवडणूकांमध्ये विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व केले. अश्या तऱ्हेने त्यांचा विद्यार्थीदशेत राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्‍या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष झाल्या.

२०१९ मधील राजकीय नाट्यातील ‘NCP’ ची  जेम्स बॉंड

२०१९ मध्ये सोनिया चर्चेत आल्या होत्या. तेव्हा त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण आणि आठवणीत राहणारा दिवस म्हणजे २३ नाेव्‍हेंबर २०१९ राेजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात भूकंप आणणारी ही घटना हाेती. तेव्हा सोनिया चर्चेत आल्या होत्या. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते. यावेळी सोनिया दुहान गुरुग्राममधील ओबेरॉय हॉटेलमधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना शिताफीने बाहेर काढलं आणि त्या चर्चेत आल्या.

शिंदेच्या बंडखोरीशी देखील संबंध? (Sonia Doohan)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते सुरतहून गुवाहाटीमध्ये काही आमदारासह गेले होते. काही दिवसानी हे आमदार गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये पोहचले होते. तेव्हा याच सोनिया दुहान यांच्‍यावर आमदारांना शिवसेनेत परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. काही आमदारांशी त्यांनी संपर्क केलाही होता. मात्र त्या यात यशस्वी झाल्या नाहीत. २०१९ आणि २०२२ मधील त्यांच्या भूमिकेमूळे त्यांची राष्ट्रवादीची ‘लेडी जेम्स बाँड’ अशी ओळख झाली. आता पुन्हा एकदा त्या शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर चर्चेत आल्या आहेत. “मी राजीनामा देत आहोत, “संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे” अशी घोषणा शरद पवार यांनी केली. यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि युवा नेतृत्व सोबत होते. या युवा नेतृत्वात सोनिया दुहान याही होत्या. आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी पडणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button