Lok Sabha Election 2024 : एनडीएची लवकरच बैठक; जुने मित्र भाजपला परत मिळणार? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : एनडीएची लवकरच बैठक; जुने मित्र भाजपला परत मिळणार?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी आता एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांची (Opposition Parties) नुकतीच एक महाबैठक पार पडली. यामध्ये 15 हून अधिक पक्षांचा सहभाग होता. निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. एनडीएची (NDA) 18 जुलैला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील अशोका हॉटेल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला गेल्या काही काळापासून भाजप पासून दुरावलेले काही जुने मित्र पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये पंजाबच्या अकाली दलाचे सुखविंदर बादल, लोजपाचे चिराग पासवान तर टीडीपीचे चंद्राबाबू नायडू हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय आणखी काही नवीन पक्ष देखील या बैठकीत सहभागी होऊ शकतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

हे ही वाचा :

13 पक्षांच्या प्रागतिक पक्षांचा पर्याय

राजस्‍थान काँग्रेसमध्‍ये ‘एकजूट’!, एकत्रित निवडणूक लढविण्‍याचा निर्धार

Back to top button