मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘ईडी’ची सुप्रीम कोर्टात धाव | पुढारी

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात 'ईडी'ची सुप्रीम कोर्टात धाव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी (Senthil Balaji) यांच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ईडीने आव्हान दिले आहे. बुधवारी (दि. २१) न्यायालय ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे.

उच्च न्यायालयाने मंत्री सेंथिल यांना केंद्रीय तपास संस्थांने केलेल्या अटकेनंतर सरकारी रुग्णालयातून चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली होती. याच आदेशाला ईडीने आव्हान दिले आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

हेही वाचा 

Back to top button