Delhi Liquor Scam | मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मागे घेण्याची परवानगी | पुढारी

Delhi Liquor Scam | मनीष सिसोदिया यांना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मागे घेण्याची परवानगी

पुढारी ऑनलाईन : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे तिहार तुरुंगात आहेत. या प्रकरणात सिसोदिया यांनी पत्नीच्या आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान मनीष सिसोदिया यांनी केलेला अंतरिम जामीन अर्ज मागे घेण्यास न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. असे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (दि.२४) सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पत्नीच्या प्रकृतीचे कारण देत त्यांनी अंतरिम जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ११ मे रोजी सुनावणी घेत, सिसोदिया यांच्या अंतरिम आणि नियमित जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने सिसोदीया यांना जामीन अर्ज मागे घेण्यासाठी देखील परवानगी दिली आहे.

यापूर्वी उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात मंगळवारी (23 मे) मनीष सिसोदिया यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ करण्यात आली.

मनीष सिसोदिया यांनी तुरूंगात खुर्च्या, टेबल आणि पुस्तके देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे. अभ्यासासाठी खुर्ची, टेबल आणि पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सिसोदिया यांच्या विनंतीवर विचार करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले.

हेही वाचा:

Back to top button