यावर्षी ७७ टक्के भारतीय कंपन्या करणार नोकरभरती | पुढारी

यावर्षी ७७ टक्के भारतीय कंपन्या करणार नोकरभरती

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  जगभरात नोकऱ्यांमधील भरतीबाबत नकारात्मक वातावरण आहे. पण भारतीय कंपन्या नवीन भरती आणि बदलीबाबत खूप आशावादी आहेत. कोलकत्ता एचआर सोल्युशन्स कंपनी जिनियस कन्सल्टंटने सर्वेक्षण केलेल्या २,१०० कंपन्यांमधील तीन-चतुर्थांश किंवा ७७% पेक्षा जास्त एचआर अधिकारी म्हणाले की, ते २०२३ २४ या कालावधीत कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.

अधिक अनुभवीस तत्काळ प्राधान्य

दक्षिण भारत आणि पश्चिम भारतातील बहुतेक कंपन्या या आर्थिक वर्षात नोकरी देऊ इच्छित आहेत. अशा कंपन्यांची संख्या ३३.३० टक्के होती. यंदा सरासरी अनुभव असलेल्या भरतीला कंपन्या प्राधान्य देत आहेत. ३६.०६% कंपन्यांनी सांगितले की, ते ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर ठेवतील. केवळ ९% कंपन्यांनी १३ वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या लोकांना कामावर घेण्याचे सांगितले आहे.

अनेक क्षेत्रांचा समावेश

जिनियस कन्सल्टंटने यावर्षी १२ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये बँकिंग फायनान्स, बांधकाम आणि अभियांत्रिकी, एज्युटेक, एफएमसीजी, हॉस्पिटॅलिटी, एचआर सोल्युशन्स, आयटी, आयटीईएस, बीपीओ, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, मीडिया, तेल आणि गॅस, फार्मा आणि मेडिकल, पॉवर आणि एनर्जी, रिअल इस्टेट, रिटेल, टेलिकॉम, ऑटो यांचा समावेश आहे आणि सहायक क्षेत्रांचा समावेश आहे.

दक्षिण, पश्चिम भारतात सर्वाधिक नोकऱ्या

  • ७७% कंपन्या या आर्थिक वर्षात नवीन भरती आणि बदलीची योजना आखत आहेत.
  • नोकरीस इच्छुक असलेल्या३३% कंपन्या देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील आहेत.
  • ३६% कंपन्या ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर ठेवण्यास प्राधान्य.
  • ६४% कंपन्यां कामावर घेण्यापूर्वी पार्श्वभूमी तपासणार

Back to top button