electric car : इलेक्ट्रिक मोटारीची निर्मिती 200 वर्षांपूर्वीच | पुढारी

electric car : इलेक्ट्रिक मोटारीची निर्मिती 200 वर्षांपूर्वीच

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इलेक्ट्रिक मोटारी आधुनिक जगाची देणगी असल्याचे मानली जाते. मात्र बहुतांश लोकांना माहीत नसेल इलेक्ट्रिक मोटार तयार करण्याचा प्रयत्न 20- 30 वर्षे नव्हे तर चक्क 200 वर्षांपूर्वी झाला होता. त्यावेळी इलेक्ट्रिक मोटारींना चार्ज करण्यासाठी खूपच वेळ लागत होता, त्याकाळी ही मोटार फार लोकप्रिय होऊ शकली नाही.

200 वर्षांपूर्वी एका स्कॉटिश मेकॅनिकने असे काही करून दाखविले की त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 1832 मध्ये मेकॅनिक रॉबर्ट अँडरसनने डिझेलवर चालणारी एक जुनी मोटार इलेक्ट्रिकमध्ये बदलली. या मोटारीत सिंगल चार्ज बॅटरीचा वापर करण्यात आला.

तिला केवळ एकदाच चार्ज केली जाऊ शकत होते. ही इलेक्ट्रिक मोटार ताशी चार किलोमीटर वेगाने सुमारे 2.5 किलोमीटर अंतर धावू शकत होती. त्यानंतर सुमारे 20 वर्षांनंतर 1865 मध्ये लीड अ‍ॅसिड बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटार फ्रान्सच्या संशोधकांनी तयार केली. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटार विकसित होण्याचे काम सातत्याने सुरू राहिले.

1891 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या रस्त्यावर इलेक्ट्रिक मोटार उतरली. यानंतर 8 वर्षांनंतर थॉमस अल्वा एडिसन यांनी निकेल बॅटरीची निर्मिती केली. यावर इलेक्ट्रिक मोटार अधिक काळ धावू शकत होती. 1899 मध्ये पहिल्यांदा हायब्रीड कार लाँच केली जी पेट्रोलच्या बॅटरीवर धावू शकत होती.

Back to top button