राहुल गांधींच्‍या ‘त्‍या’ याचिकेवर गुजरात उच्‍च न्‍यायालयात सुनावणी | पुढारी

राहुल गांधींच्‍या 'त्‍या' याचिकेवर गुजरात उच्‍च न्‍यायालयात सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मानहानी प्रकरणी झालेल्‍या कारवाईला स्‍थगिती देण्‍यात यावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी दाखल केली होती. यावर आज (दि.२९) गुजरात उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राहुल यांच्या वतीने करण्यात आली. तक्रारदार पूर्णेश मोदी यांची रेकॉर्डवरील कागदपत्रे सादर करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. आता या प्रकरणाची पुढील २ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सिंघवींचा जोरदार युक्‍तीवाद

आज न्‍यायमूर्ती हेमंत एम. प्रचाक यांच्‍या खंडपीठासमोर राहुल गांधी यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी युक्‍तीवाद केला. ते म्‍हणाले, राहुल गांधी यांनी मोदी आडनाववर केलेली टीका हा गंभीर गुन्‍हा नाही. त्‍यामुळे या प्रकरणी त्‍यांना दोषी निर्णयाला स्‍थगिती देण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांनी केली. तसेच राहुल गांधींच्या कथित विधानांचा कोणताही पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. ‘ज्याचे नाव घेतले नाही, त्याने या प्रकरणी तक्रार केली. देशात १३ कोटी मोदी आडनावाचे व्‍यक्‍ती आहेत. राजकीय वैमनस्यातून संपूर्ण फिर्याद दाखल करण्यात आली. आम्ही खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करत आहोत. या वेळी सिंघवी यांनी उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांचे निकाल वाचन केले.

तक्रारदार पूर्णेश मोदी यांची रेकॉर्डवरील कागदपत्रे सादर करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. आता या प्रकरणाची पुढील २ मे रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button