Sperm Robot द्वारे गर्भधारणा, दोन बाळांचा जन्म, जगातील पहिलीच घटना | पुढारी

Sperm Robot द्वारे गर्भधारणा, दोन बाळांचा जन्म, जगातील पहिलीच घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूयॉर्कमध्ये शुक्राणूचे इंजेक्शन देणार्‍या रोबोटद्वारे गर्भधारणा झालेल्या पहिल्या बाळांचा जन्म झाला आहे. न्यूयॉर्कच्या न्यू होप फर्टिलिटी सेंटरमध्ये बार्सिलोना, स्पेन येथील अभियंत्यांच्या टीमने अंडाशयामध्ये शुक्राणू सोडण्यासाठी रोबोटिक सुईचा वापर केला. या प्रक्रियेमुळे दोन सुदृढ मुलींचा जन्म झाला आहे.

स्पेनमधील अभियंत्यांच्या एका टीमने शुक्राणू-इंजेक्शन देणारा रोबोट यशस्वीरित्या तयार केला आहे. या रोबोटने सुमारे १२ हून अधिक मादी अंड्यांचे फर्टिलाईज केले आहे. रोबोटमधून निघालेल्या शुक्राणूंमुळे गर्भधारणा होऊन दोन मुलींचा जन्म झाला आहे. न्यूयॉर्क शहरातील न्यू होप फर्टिलिटी सेंटरने हा प्रयोग यशस्वी केला आहे.

एका अहवालानुसार, या प्रक्रियेत वापरलेला रोबोट हा एक प्रोटोटाइप आहे, जो भविष्यात इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ओव्हरचर लाइफ हा रोबोट विकसित करणार्‍या स्टार्टअप कंपनीने म्हटले आहे की, त्यांचे उपकरण IVF स्वयंचलित करण्याच्या दिशेने एक प्रारंभिक पाऊल आहे, भविष्यात ही प्रक्रिया कमी खर्चात आणि अधिक सामान्य होईल.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, एका इंजिनियरने सोनी प्लेस्टेशन 5 चा वापर करून मादी अंड्यांमध्ये शुक्राणूची एक पेशी सोडली. गर्भधारणेनंतर जन्माला आलेल्या दोन्ही मुले ‘रोबो’द्वारे जन्माला आलेली पहिली मुले असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. IVF प्रक्रिया सध्या प्रशिक्षित भ्रूणशास्त्रज्ञांद्वारे हाताने केली जाते. या प्रयोगशाळा महाग आहेत, तसेच प्रक्रिया लांब आणि नाजूक आहे. IVF स्वयंचलित करण्याचे अंतिम उद्दिष्ट लोकांना मुले होण्यास मदत करणे हे आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे ५ लाख बालके IVF द्वारे जन्माला येतात.

हेही वाचा : 

Back to top button