कर्नाटकचे पोलिस दल देशात अव्वल; महाराष्ट्र 11 व्या स्थानी | पुढारी

कर्नाटकचे पोलिस दल देशात अव्वल; महाराष्ट्र 11 व्या स्थानी

नवी दिल्ली : देशातील उत्कृष्ट पोलिस दलांच्या यादीत दक्षिणेतील राज्यांनी बाजी मारली असून कर्नाटकने पहिला क्रमांक मिळवला आहे तर या आधीच्या मानांकनात सलग दोन वेळा देशात अव्वल असलेल्या महाराष्ट्राच्या कामगिरीत घट झाली असून महाराष्ट्र अकराव्या स्थानी गेला आहे.

कर्नाटकनंतर तामिळनाडू दुसर्‍या व तेलंगणा तिसर्‍या क्रमांकावर आहे. पोलिस, तुरुंग, कायदेशीर सहाय्य आणि न्यायदान यंत्रणा या चार बाबींबाबत काही संस्थांनी इंडिया जस्टिस रिपोर्ट तयार केला आहे. त्यात या यंत्रणांचे राज्यनिहाय मानांकन केले जाते. यंदाचा पोलिस दलाबाबतचा अहवाल जारी झाला असून त्यात मोठ्या व मध्यम आकाराच्या 18 आणि छोट्या आकाराच्या सात राज्यांचे स्वतंत्र मानांकन जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटक पोलिसांना 10 पैकी 6.38 अंक गुण मिळाले आहेत. तामिळनाडू आणि तेलंगणा यांना समसमान 6.11 गुण आहेत.

Back to top button